Pune : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून 250 कोटींच्या वर्गीकरणाचा सपाटा : दिलीप बराटे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सुमारे 250 कोटींच्या वर्गीकरणाचा सपाटाच लावला आहे. महापालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या या दबावाला बळी पडू नये, अन्यथा राज्य सरकारकडे तक्रार करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी दिला आहे.

या संदर्भातील नाराजी व्यक्त करणारे पत्रच महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत वर्गीकरण करू नये, असे ठरले होते. तरीही वर्गीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव वाढत असल्याचे दिलीप बराटे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेत्यांना या विषयाची माहिती आहे. आयुक्तांच्या परिपत्रकाप्रमाणे मुख्य खात्याचे अंदाजपत्रकातील रक्कम वर्गीकरण करण्यास मान्यता देण्यात येणार नाही, असे आदेश खाते प्रमुखांना पारित करण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर जवळपास 250 कोटी रुपये मुख्य खात्याचे वर्गीकरण मुख्य सभेत केले आहे. हे वर्गीकरण नियमबाह्य असून, त्याची कार्यवाही कुठल्याही खाते प्रमुखाने करू नयेत, असे आदेश आयुक्तांनी देण्याची मागणी बराटे यांनी पत्रात केली आहे.

यापुढे वर्गीकरण नाही – धीरज घाटे

यापुढे वर्गीकरण होणार नसल्याचे सभागृहनेते धीरज घाटे यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धिरज घाटे यांची बैठक होऊन त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पक्ष बैठकीत नगरसेवकांनाही याची माहिती देण्यात आली होती. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणे झाले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी हा नियम लागू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.