Pune: ‘राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा भाजपचा प्रयत्न’ 

मनसेचे नेते अभिजीत पानसे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – राज ठाकरे जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची  पोलखोल करत आहेत.  त्यामुळे भाजपा नेते सध्या राज ठाकरे यांच्या सभांवर कशी आडकाठी आणता येईल. कोणत्या खटला उकरून गुन्हा दाखल करता येईल. यावर विचार करत आहेत. ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी केला आहे. राजसाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असेही ते म्हणाले. 

पुणे, सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील गोयल गंगा मैदानावर झालेल्या मनसेच्या सभेत बोलताना पानसे यांनी हा दावा केला. पानसे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • भाजप नेते सध्या राज ठाकरे यांच्या सभांवर कशी आडकाठी आणता येईल. कोणत्या खटला उकरून गुन्हा दाखल करता येईल. यावर विचार करत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ वकिलांशी चर्चा सुरू केली असल्याचा दावाही  पानसे यांनी सभेत बोलताना केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.