Pune :भाजपला सत्तेचा माज आलाय -अजित पवार

एमपीसी न्यूज – भाजप आणि शिवसेनाला सत्तेमध्ये येऊन पाच वर्षांचा कालवधी झाला आहे. मात्र, या पाच वर्षात सत्ताधारी भाजपकडून आघाडीतील काही नेत्यांना सत्तेचा वापर करून अनेक प्रकरणाच्या चौकशी लावू, अशी भीती दाखविली जाते. नोटिसा बजावल्या जात आहे. यातून भाजपला सत्तेचा माज आला आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आमच सरकार आल्यावर एकापण खेकडयाने धरण फुटणार नाही किंवा एकाही पोलिसांचे अपहरण होणार नाही. तर, मागील काही महिन्यामध्ये सत्ताधारी भाजपच्या मंत्र्याकडून बेताल वक्तव्य केली जात आहे. हे लक्षात घेता मुंबईतील इमारत दुर्घटनेबाबत भाजपचे मंत्री ती इमारत घुशीमुळे पडली, असे सांगतील असे वाटले होते, अशा शब्दांत भाजपवर त्यांनी निशाणा साधला.

  • तसेच ते पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षे भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये असून देखील काल शिवसेनेकडून विमा कंपन्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. शिवसेना सत्तेमध्ये असताना मोर्चा काढण्याची वेळ त्याच्यावर आल्याची पाहून वाईट वाटले. अशा शब्दांत शिवसेनेला टोला लगावत. शेतकर्‍यांच्या विम्याच्या प्रश्नावर मोर्चा काढायचा होता. तर, मुंबईत अधिवेशन काळात विधीमंडळावर का नाही काढला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, पाश्चिम महाराष्ट्र मुक्त राष्ट्रवादी करणार, अशी घोषणा भाजपच्या काही मंत्र्याकडून केली जात आहे. हे लक्षात घेता अशा घोषणा करणार्‍या व्यक्तींना जशाच तसे उत्तर देण्याचे काम करा आणि सर्वांनी एक जीवाने काम करण्याचे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  • काही करून विधानसभा निवडणुकीत 145चा आकडा गाठायचा -अजित पवार
    लोकसभा निवडणुकीत राज्यभरात पक्षातील कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. तरी देखील आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा पराभव लक्षात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने सत्ताधाऱ्यांचा चुकीचा कारभार नागरिकापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. यासाठी केवळ आपल्याकडे आता साधारण तीन महिन्याचा कालावधी शिल्लक राहीला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काही झाले तरी 145 चा आकडा गाठयाचा आहे. हा निश्चय आघाडीचा असून त्यादृष्टीने सर्वानी एक जीवने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.