Pune : भाजप हा पक्ष नसून देशासमोरील आपत्ती -माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत

ही आपत्ती घालवण्यासाठी विरोधकांना निवडून आणा; नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – भाजपला देशाची धर्मनिरपेक्ष ही ओळख पुसायची आहे. त्यांना राज्यघटना अमान्य आहे. घटनेच्या विरुद्ध या राजवटीची भूमिका सुरू असून त्यांना देशात हुकुमशाही आणायची आहे. त्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. भाजप हा पक्ष नसून देशासमोरील आपत्ती, ही आपत्ती घालवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना विरोधकांना बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी केले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमच येथे मतदार जागृती परिषदेच्या वतीने ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, स्वामी अग्निवेश, तिस्ता सेटलवाड, कुमार सप्तर्षी आदी उपस्थित होते.

  • यावेळी सावंत पुढे म्हणाले, ज्या व्यक्तींना घटना वाचवायची आहे, कायद्याप्रमाणे राज्यकारभार सुरू रहावा अशी अपेक्षा असेल तर अशा व्यक्तींनी एकत्र येऊन ही आपत्ती घालवली पाहिजे. यासाठी विरोधी पक्षांनीही एकत्र यावं. मतदारांनी त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा आणि एकत्र यायला भाग पाडावे. विरोधी पक्षानेही उमेदवार निवडताना निस्वार्थी, सेवाभावी उमेदवार निवडावे..

नागरिकांनो, विरोधीपक्षाच्या एकजुटिला बहुमताने निवडून द्या
आजचा देशाचा कारभार ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने सुरू आहे. कायदा नाही, घटना नाही अशाप्रकारे सध्या देशाची वाटचाल सुरू आहे. लोकसभेतील 442 सभासद करोडपती आहेत, 128 सभासद गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत..ही मंडळी जर राज्यकर्ते असतील तर ते कुणासाठी आणि कशाप्रकारे राज्य करत आहेत, हे वेगळं सांगायला नको. यांना घालवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना विरोधीपक्षाच्या एकजुटिला बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.