Pune BJP News: भाजपच्या पुणे शहर प्रवक्तेपदी 7 जणांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर प्रवक्ते पदांवरील नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांना नियुक्तीपत्रे दिली. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार आमदार सिद्धार्थ शिरोळे, संदीप खर्डेकर, मंगेश गोळे, संजय मयेकर, धनंजय जाधव, श्रीपाद ढेकणे आणि विकास लवाटे अशा 7 जणांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.