Pune : भाजपच्या महापालिका पदाधिकाऱ्यांचा आता कस लागणार

एमपीसी न्यूज – राज्यात आता काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. त्यातून माजी महापौर मुक्ता टिळक आणि माजी स्थायीसमिती अध्यक्ष सुनील कांबळे हे आमदार म्हणून निवडून गेल्याने शहरातील नियोजित प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारी भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर आलेली आहे. त्यामुळे त्यांचा आता कस लागणार आहे.

महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासहित महापालिका पदाधिकाऱ्यांना आता समान पाणीपुरवठा योजना, मेट्रो, शिवसृष्टी, जायका, बिडीपी, आणखी 23 गावांचा समावेश, पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी देणे, महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय, एचसीएमटीआर असे अनेक प्रकल्प मार्गी लावताना कस लागणार आहे. कारण हे सर्व प्रकल्प राज्य शासनाशी निगडित आहेत.

कस लागणार आहे. सुनील कांबळे आणि माजी महापौर मुक्ता टिळक हे दोघे आमदार झाले आहेत. या दोघांची जबाबदारी आता जास्त वाढली आहे. समान पाणीपुरवठा योजना, मेट्रो, शिवसृष्टी, जायका, बिडीपी, आणखी 23 गावांचा समावेश, पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी देणे, महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय, एच सी एम टी आर असे अनेक प्रकल्प राज्य शासनाशी संबंधित आहेत.

सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 97 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, पुणेकरांना दोनवेळ पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. केंद्रापासून महापालिकेपर्यंत भाजपची सत्ता असतानाही पुणेकरांना दोन वेळ पाणी मिळू शकलेले नाही. सत्ताबदल झाल्यामुळे आगामी काळात राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांच्यात संघर्ष पाहायला मिळू शकतो. महापालिका निवडणुकीला आता केवळ दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. चार जणांच्या प्रभागात भाजपला फायदा झाला. आगामी महापालिकेची निवडणूक वॉर्ड किंवा दोन जणांचा प्रभाग होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
अन्य पक्षातून येऊन भाजपमध्ये प्रवेश करून अनेकजण नगरसेवक झाले. या माननीयांना मागील तीन वर्षांत एकही मानाचे पद मिळालेले नाही. त्यामुळे यातील बहुतांशी नगरसेवक परत शिवसेना – राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.