Pune : दगाफटका टाळण्यासाठी भाजप दक्ष; शुक्रवारी मुरलीधर मोहोळ होणार महापौर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. त्यामध्ये इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करून नगरसेवक झालेल्यांची संख्या 30 च्या आसपास आहे. यातील बहुतांशी नगरसेवक नाराज आहेत. कारण, त्यांना 3 वर्षांच्या कालावधीत महापालिकेत कोणतेही महत्वाचे पद मिळाले नाही. त्यावर भाजपच्या नेते मंडळीचे बारीक लक्ष आहे.

महापौर पदासाठी अभ्यासू नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचीच शुक्रवारी अधिकृत निवड निश्चित मानले जात आहे. तर, उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा करून भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

आरपीआय (आठवले गट)ला उपमहापौर पद न दिल्याने ते नाराज आहेत. राज्यसभेचे खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, सरचिटणीस गणेश बिडकर यांनी आरपीआयची समजूत घातली. पुढील वर्षी आरपीआयला उपमहापौर पद देण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, असा दावा करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.