Pune : भाजप यशस्वी होणार नाही, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांची टीका

एमपीसी न्यूज – भाजपने कितीही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला (Pune) तरी त्यांना राज्यात यश येणार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली.

भाजपच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत असल्याचेही आंबेडकर म्हणाले. कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीसाठी प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते. सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोणताही नेता कोणत्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर फार फरक पडत नाही. पक्ष हा कायम राहतो, अशी परिस्थिती आहे.

Chikhali : चिखली रोड येथील गणेश मंदिरांमध्ये माघी गणेश जयंती उत्साहात साजरी

त्यामुळे काँग्रेसवर फार परिणाम होईल असे वाटत नाही,’ असेही आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना सांगितले. ‘चारशेच्या पुढे जाऊ असा दावा भाजप करीत असला, तरी त्यामागे भीती आहे. अशीच भीती (Pune) निर्माण करण्यासाठी राजकीय; तसेच अराजकीय व्यापारी, मत नोंदवू शकणाऱ्या व्यक्तींवरही ते धाडी घालत आहेत,’ अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, यावेळी आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांनी पक्ष काढण्याची विनंती केली. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी भुजबळ आग्रही असल्याचा दावाही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.