Pune : भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या वतीने ‘मी अटल’ या ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी ग्रामीणच्या वतीने ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. आयोजकांनी सांगितलेल्या चार विषयांपैकी एका विषयावर भाषण व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड करून व्हॉट्सअपवर पाठवायचे आहे स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल असल्याची माहिती पुणे जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. या विषाणूंवर मात करण्यासाठी सर्व देश शर्थीचे प्रयत्न करत आहे. भारतात या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 21 दिवसांचे लाॅकडाऊन जाहीर केले आहे. कोरोना आजाराच्या संकट काळात संपूर्ण देश घरात असताना नागरीकांच्या कल्पनेला एक दिशा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. ही वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन असून स्पर्धकांनी त्यांची भाषणाचा व्हिडिओ व्हाट्सअपद्वारे आयोजकांना पाठवायचा आहे.

या स्पर्धेसाठी चार विषय आयोजकांकडून देण्यात आले आहे.

1) कोरोना एक वैश्विक महामारी

2) संघटनेचे महत्व

3) समर्पित व्यक्तिमत्व

4) अटलजी एक युगपुरूष

स्पर्धकांनी भाषणाचा मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतील 5 मिनिटांचा व्हिडिओ 9139047776 / 9561929995 या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे व संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी ही स्पर्धा खुली असल्याचे भाजपायुमो जिल्हा विद्यार्थी आघाडीचे ग्रामीणचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण, सरचिटणीस अनिकेत राक्षे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.