Pune : भाजप आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून मनसेचा निषेध

एमपीसी न्यूज- भाजप आमदार राम कदम यांनी मुलींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुण्यात आज, बुधवारी मनसेच्या वतीने राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

हिम्मत असेल तर राम कदम यांनी एक मुलगी पळवून आणून दाखवा मग तुम्हला मनसेचा हिसका दाखवू अस आव्हान पुणे शहर मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील यांनी दिला आहे. यावेळी राम कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.