Pune: महाविकास आघाडी विरोधात भाजपचे आंदोलन, बारा बलुतेदारांना पॅकेज देण्याची गिरीश बापट यांची मागणी

Pune: BJP's agitation against Mahavikas Aghadi, Girish Bapat demands package for bara Balutedars केंद्र सरकारने राज्याला भरघोस निधी देऊनही राज्य सरकार बारा बलुतेदारांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही, हे अतिशय दुर्दवी आहे.

एमपीसी न्यूज- बारा बलुतेदारांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंदोलन करण्यात आले. झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्याकरिता भाजपा कसबा मतदारसंघच्यावतीने कसबा गणपतीसमोर आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने राज्य शासनाने पॅकेज द्यावे, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली.

केंद्र सरकारने राज्याला भरघोस निधी देऊनही राज्य सरकार बारा बलुतेदारांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही, हे अतिशय दुर्दवी आहे. सरकार बारा बलुतेदारांना हेतुपुरस्सर डावलत आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहे.

पुणे शहर भाजपच्यावतीने शहराच्या आठही मतदारसंघात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मागील सरकारने बारा बलुतेदारांना न्याय दिला, ती गोष्ट आघाडी सरकारच्या काळात होत नाही.

बारा बलुतेदारांना या सरकारने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. या सरकारला जाग आणल्याशिवाय तसेच आर्थिक पॅकेज जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष स्वरदा बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे, नगरसेवक अजय खेडेकर, योगेश समेळ, सम्राट थोरात, राजेश येनपुरे, नगरसेविका गायत्री खडके, विजयालक्ष्मी हरीहर, आरती कोंढरे, राजेश येनपुरे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहर संघटक राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, संजय देशमुख, छगन बुलाखे, राजू परदेशी, अमित कंक, राजू काकडे, गणेश पाचेरकर, उमेश चव्हाण, अजय तांबट, भासमराज तिकोने, पुष्कर तुळजापूरकर, वैशाली नाईक, रिक्षा संघटना, नाभिक संघटना, घरेलू कामगार, चर्मकार संघटना, विडी कामगार, असे बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी तसेच तुळशीबाग व्यापारी संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.