Pune : महात्मा गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने भाजपच्या अनंतकुमार हेगडे यांचा काँगेसतर्फे जोडे मारून निषेध

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी बेताल वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँगेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथे हेगडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी रमेश बागवे म्हणाले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अहिंसावादी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीला drama संबोधणाऱ्या अनंतकुमार हेगडे यांचा मी जाहीर निषेध करतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते नेल्सन मंडेला, बाराक ओबामा आणि मार्टिन ल्युथर किंग यांनी ज्यांचा आदर्श घेऊन स्वातंत्र्याचा लढा लढला. अशा थोर व्यक्तीला नावे ठेवून भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री या देशामध्ये महात्मा गांधी यांचे नाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हेगडे यांचे नेते या देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय, असे दाखविण्याचं नाटक करतात.

गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे यांचे स्मारक आणि पुतळे उभारणाऱ्यांवर कारवाई देखील करीत नाहीत. भारतीय जनता पार्टी व संघ परिवार या देशात जातीयवाद निर्माण करून महात्मा गांधीजींचे अहिंसेचे तत्व धुळीस मिळविण्याचे काम करीत आहेत. मनुवादी वृत्ती या देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने या देशामध्ये स्वातंत्र्य मिळविण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. ते टिकविण्यासाठी काँगेस रस्त्यावर येऊन आंदोलन देखील करणार असल्याचा इशारा रमेश बागवे यांनी दिला.

प्रदेश प्रतिनिधी नीता रजपूत, संगीता तिवारी यांचीही यावेळी भाषणे झाली. या आंदोलनात कमल व्यवहारे, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, नारायण पाटोळे, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सुनील घाडगे, प्रदीप परदेशी, राजेंद्र भुतडा, शेखर कपोते, नितीन परतानी, राजेंद्र नखाले, सुरेखा खंडागळे, शिलार रत्नागिरी, साहिल केदारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.