Pune: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे देणार ‘हाता’ला साथ

लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

एमपीसी न्यूज – भाजपचे राज्यसभेचे सहयोगी खासदार संजय काकडे हाताला साथ देणार आहेत. लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश कणार असल्याची घोषणा स्वत: काकडे यांनी आज (रविवारी) पुण्यात केली. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेला काकडेच उमेदवार असण्याची शक्यात वर्तविली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वैशाली हॉटेल येथे पुणे कट्टा अंतर्गत शहरातील राजकीय घडामोडीवर चहा आणि इडली सांबर घेत भाजप सहयोगी खासदार संजय काकडे, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, माजी आमदार मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, भाजपचे नेते नगरसेवक मुरलीधर मोहोळ या सर्व नेते मंडळीनी अनेक विषयावर चर्चा देखील केली. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश सातपुते यांनी केले होते.

  • पत्रकारांशी बोलताना संजय काकडे म्हणाले, सध्याची बदलेली परस्थिती पाहता मी काँग्रेसमध्ये लवकरच पक्षप्रवेश करणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी जी जबाबदारी देतील, ती आपल्या पद्धतीने पार पाडणार आहे. दिल्लीत काँग्रेस नेत्यांना भेटून काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा मी बोलून दाखविली होती.

काँग्रेस त्यागातून तयार झालेला पक्ष आहे. सगळ्या जाती धर्मांना काँग्रेस एकमेव पक्ष सगळ्यांना घेऊन पुढे जातो. सर्वांचा सन्मान केला जातो. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या तीन नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. असा भारतात एकमेव पक्ष आहे. मी कोणतेही आश्वासन घेतले नाही. अटी-शर्ती ठेवल्या नाहीत. पक्षाने सांगितले की लोकसभा लढवा आणि थांबायला सांगितल्यानंतर थांबणार आहे. पक्ष देईल, ती जबाबदारी पार पाडणार आहे, असेही काकडे यांनी सांगितले.

  • यावेळी खासदार संजय काकडे म्हणाले,  मला आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमदेवार मिळाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून 50 हजाराचे लीड घेईल. तसेच या निवडणुकीत भाजपकडून अनिल शिरोळेपेक्षा गिरीश बापट हे सोपे स्पर्धक असून मी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार आणि निवडणूक लढविणार आहे.

हिंदुत्वाच्या व्यापक मुद्द्यावर आमची युती : नीलम गोऱ्हे
सेना आणि भाजपमध्ये मतभेद असून देखील हिंदुत्वाच्या व्यापक मुद्द्यावर आमची युती झाली आहे. तसेच आमच्यातील मतभेद मागे ठेवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत युतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व शक्तीने प्रयत्न केले जाणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असून लोकसभेची जरी संधी मिळाली नसली तरी मी राज्यसभेची वाट पाहिली. अशी पुढील राजकीय वाटचालीची भावना त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.