Pune : भाजप कार्यकर्ता शाम शिंदे जबरी चोरीच्या गुन्ह्यात गजाआड; गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – खडकवासाला भागात सुमारे पाच लाखांची रोकड लुटणाऱ्या एका भाजपच्या कार्यकर्त्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शाम शिंदे असे अटक केलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारे पाच लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी श्याम शिंदेला अटक केली आहे. तो भाजपचा कार्यकर्ता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अडीच वर्षापुर्वी त्याचा भाजपात प्रवेश झाला होता. त्यवेळी तो पोलिसाला मारहाणकरुन नुकताच कारागृहाबाहेर आला होता.

भाजपचा माथाडीं विभागाचा अध्यक्ष श्याम शिंदे याला २०१६ मध्ये महापालिका निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्याला पुणे पोलिसांनी पाच लाख रूपयाच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने अटक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.