Pune : भाजपचा जाहीरनामा ‘2014 ची’च पुनरावृत्ती -सुश्मिता देव

एमपीसी न्यूज – भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रसिध्द करण्यात आलेला जाहीरनामा हा ‘2014 ची’च पुनरावृत्ती असल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी केली.

काँग्रेस भवन येथे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. रजनी पाटील, माजी महापौर कमल व्यवहारे, हडपसर विधानसभा महिला संघटक माया डुरे यावेळी उपस्थित होते.

यावेळी सुश्मिता देव म्हणाल्या, राज्यात बेरोजगारी वाढतीच आहे. तरीही भाजपच्या जाहीरनाम्यात 1 कोटी रोजगार देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. 5 हजार गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरूच आहेत. 2014 मध्ये टँकर मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पण, टँकरमुक्ती अद्यापही झाली नाही.

आताच्या जाहिरनाम्यातही टँकर मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यामुळे 1 नागरिकाचा मृत्यू झाला. पण, त्यांचा नातेवाईकांना नड्डा भेटले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like