Pune : भाजपचे उद्या दूध एल्गार आंदोलन

BJP's milk Elgar agitation tomorrow : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे. दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे. गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये दर द्यावा, या प्रमुख मागण्या राज्य शासनाने मान्य कराव्यात, यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने उद्या (दि. १ ऑगस्ट) विविध ठिकाणी दूध एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली मांजरी येथे सकाळी 8 ते 10 या वेळेत अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करुन त्याच ठिकाणी मोठ्या शेगडीवर ठेवलेल्या कढईत त्याचा खवा तयार केला जाईल.

नंतर हा खवा उत्कृष्ट पॅकींगमध्ये पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून हा खवा मुख्यमंत्र्यांना पाठवला जाईल.

वडगावशेरी मतदारसंघाच्यावतीने शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली मांजरी येथे, पर्वती मतदारसंघ नसरापूर येथे, कोथरुड मतदारसंघ बावधन येथे, कॅन्टोन्मेंट मतदारसंघ उरळी मंतरवाडी फाटा, शिवाजीनगर मतदारसंघ वाघोली येथे, कसबा मतदारसंघ कोंढणपूर येथे, हडपसर मतदारसंघ कृषी उत्पन्न बाजार समिती मांजरी येथे, खडकवासला मतदारसंघातर्फे कात्रज येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.