Pune: बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी 323 रस्ते रुंद करण्याचा भाजपचा डाव, विरोधकांचा आरोप

Pune: BJP's move to widen 323 roads for the benefit of builders, opposition alleges, gives statement to dy cm ajit pawar. तर, पुणे महापालिकेने बहुमताच्या आधारावर चुकीचा निर्णय घेतला तर राज्य शासनाला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशाराही अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

एमपीसी न्यूज- ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून 323 रस्ते रस्ते रुंद करण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कौन्सिल हॉल येथे भेट घेण्यात आली.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे यावेळी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाडही यावेळी उपस्थित होते. ठराविक लोकांचे हित न बघता पुणेकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्या, अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी दिल्या.

सर्वच रस्ते रुंद करण्याबाबत पुणे महापालिकेतर्फे धोरण करावे, असे आदेश पवार यांनी आयुक्तांना दिले. पुण्यातील 323 अरुंद रस्ते रुंद करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनातर्फे स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

येत्या मंगळवारी त्यावर चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांना विचारात घेऊनच हा विषय मंजूर करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी यापूर्वीच म्हटले आहे.

शहरातील सर्वच रस्ते रुंद करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचना नुसार कार्यवाही होणार असल्याचे आयुक्त म्हणाले.

तर, पुणे महापालिकेने बहुमताच्या आधारावर चुकीचा निर्णय घेतला तर राज्य शासनाला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशाराही अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन असताना विद्यापीठ चौकातील दोन्ही पूल तातडीने पडणे गरजेचे आहे. त्यासाठी अजित पवार यांनी वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी हा विषय मंजूर करीत नसल्याची टीका दीपाली धुमाळ यांनी केली.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी हा पूल पाडणे आवश्यक आहे. त्याठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्याचा सर्व खर्च राज्य शासन करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यासंदर्भात चर्चा झाली आहे, असेही धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.