Pune: विधानसभेला जिल्ह्यात भाजपची घौडदौड वाढेल -गिरीश बापट

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे उमेदवार मागीलवेळी पेक्षा अधिक मताने विजयी होतील. जिल्ह्यात 2014 पेक्षा भाजप आमदारांची संख्या वाढलेली असेल. पुणे जिल्ह्यात भाजपची घौडदौड वाढेल, असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. तसेच पुणे जिल्ह्याची जबाबदारी आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. विरोधक गलितगात्र झाले आहेत. भाजप मजबूत झाला आहे. विकासकामांची शिदोरी घेऊन कार्यकर्ते मतदारांसमोर जातील. पक्षाने दिलेल्या दिशेनुसार आमचे काम चालू आहे.

केंद्रीय, राज्य नेतृत्व युतीतील जागा वाटपबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगत बापट यांनी त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. पुणे जिल्ह्यात भाजपची घौडदौड वाढेल. 2014 पेक्षा आमदारांची संख्या वाढेल. आम्ही तीन वर्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. पिंपरी-चिंचवड शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्र्यांच्या जाहीर सभा होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.