Pune : मुख्यमंत्र्यांविरोधात बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी भाजपच्या सोशल मीडिया सेलवर गुन्हा दाखल

BJP's social media cell filed a case against the Chief Minister for posting defamatory text

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघाडी विरोधात महाराष्ट्र भाजपा वाॅररुममधील मिडिया सेलच्या वतीने आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

या मजकुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ‘मुख्यमंत्री झाला, कोरोना आला. खराब पायगुण, पणवती’ अशा आशयाचा मजकुर टाकून बदनामी केली असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला होता.

पाटील यांनी त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पुणे सायबर शाखेने भारतीय दंड संहितेच्या कलम 500 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.