Pune : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज – शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन (Pune) व सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 125 जणांनी रक्तदान केले. एस.पी. कॉलेज येथे सोमवार 20 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात संकलित होणारे रक्त आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेजला (एएफएमसी) देण्यात आले.

आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, स. प. जिमखाना, एनसीसी, एनएसएस चा सहभाग या शिबिरात होता. फाऊंडेशनच्या संस्थापक गीता गोडबोले, उपाध्यक्ष लायन सतीश राजहंस, मेजर डॉ. शाहीन भाटी, प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, कर्नल संदीप निगडे, सुजय गोडबोले, रणजीत चामले यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे व अतुल अग्निहोत्री यांनीही शिबिराला भेट दिली. शहीद दिनानिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Pimpri-Chinchwad : सराईत दुचाकी चोरांना अटक, 3 लाखांच्या सात दुचाकी जप्त

2003 साली वयाच्या 23 व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ऑपरेशन पराक्रम (Pune) दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम करण्यासाठी त्यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांनी ‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’ स्थापन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.