Pune : पुना सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – पुना सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सिक्युरिटी एजन्सीच्या (Pune) वतीने आज दि.28 रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर चे आयोजन केले होते.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मार्फत चाकण मध्ये एका प्रायव्हेट कंपनीत आणि गरवारे रक्तपेढी जनरल हॉस्पिटल तळेगाव या ठिकाणी ; त्यात 133 सुरक्षा रक्षक यांनी आपले रक्तदान करून समाजसेवेत आपले योगदान दिले.

Pune : अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एकाला अटक

चाकण विभागात एकनाथ रंगारी आणि विनायक शिंदे आणि जनरल हॉस्पिटल गरवारे रक्तपेढी येथे सर्जेस पाटील आणि मच्छिंद्र सूर्यवंशी या कंपनी अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली रक्तदान शिबिर संपन्न झाले.

पूना सिक्युरिटी ही एजन्सी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा पुरवत असताना असे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.