Pune : रक्तदान शिबिरातून मुंबई हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

एमपीसी न्यूज – मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्यातील शहीद पोलीस व जवानांना अभिवादन करण्यासाठी ससून प्रादेशिक रक्तपेढीच्या सहकार्याने स्व. हाजी नुरमोहम्मद उस्मान रिक्षा स्टॅन्डच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. पुणे लष्कर भागातील कोहिनुर हॉटेल चौकात झालेल्या या रक्तदान शिबिरात 50 पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले . तसेच शहीद जवानांना सायंकाळी मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहण्यात आली.

या रक्तदान शिबिराचे आयोजन हसन रंगरेज , मोहम्मद अली रंगरेज , तौफिक कुरेशी , मोहसीन शेख , शेर नूर मोहम्मद रंगरेज , मोहसीन शेख आदींनी केले होते. यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, विकास भांबुरे, राजेंद्र शहा, विजय भोसले, अशोक देशमुख, तन्वीर तांबोळी, वासिम कुरेशी, कुमार शिंदे, मन्सूर शेख, जावेद खान, गनी शेख, चंद्रशेखर मुळे, व्हेनिस जॉर्ज, जलील परांडे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी ससून प्रादेशिक रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ राजश्री चांदोडकर, समाजसेवा अधीक्षक शरद देसले, अरुण बर्डे, डॉ तेजल कुरापटी,
डॉ गौरव देशमुख, परिचारिका मनीषा दिघे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्योती साळुंके, सहाय्यक ज्योतिराव गायकवाड, सहाय्यक लाजर लक्कीपोगू ,
तंत्रज्ञान प्रथमेश लडकत, प्रतीक्षा भिलारे व राहुल धायगुडे आदींनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.