Pune : कात्रज तलावात बोटिंग सुविधा उपलब्ध होईल : शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – कात्रज तलावातील जलपर्णी व गाळमिश्रित पाणी काढल्यानंतर पुढील कालावधीत हिच पद्धती अवलंबून पाण्यावर नियंत्रण राखता येईल. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याची पातळी नियंत्रित होऊन पूरपरिस्तिथी ओढवणार नाही. त्याचबरोबर तलावातील व परिसरातील स्वच्छता झाल्यामुळे तलावातील पाणी स्वछ राहून पर्यावरण संतुलन राखले जाईल. त्यानंतर या तलावात बोटिंग सुविधा उपलब्ध होईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

सायफन यंत्रणेद्वारे कात्रज तलाव साफ करणे शक्य आहे. त्यादृष्टीने पाणी पातळी कमी करण्याची कामे प्रगती पथावर आहेत. मागील वर्षी अनपेक्षितरित्या ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कात्रज तलाव ते अरणेश्वर , सहकारनगर, दत्तवाडी, दांडेकर पूल, मित्रमंडळ व नजीकच्या परिसरातील आंबील ओढयातील पुरपरिस्थितीमुळे या भागातील सीमाभिंती, सोसायटी, वसाहती, अपार्टमेंट्स अशा विविध भागांतील जीवित व वित्तहानी झालेली होती.

यावर्षी अशी पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पावसाळा पूर्व कामांच्या नियोजनाच्या दृष्टीने या भागातील आंबील ओढयातील गाळ, राडारोडा काढण्याचे कामे युद्धपातळीवर करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पुणे शहरात कोरोनाचे संकट असतानाही हे काम करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.