BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लोहगाव परिसरातील शाळेच्या मैदानावर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू!

संशयास्पद वस्तू पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरु असल्याची पोलिसांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे येथील लोहगाव परिसरात असलेल्या एका एअर फोर्स शाळेच्या मैदानावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. त्यामुळे ही वस्तू नक्की काय आहे? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याचा तपास विमानतळ पोलीस करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लोहगाव परिसरात असलेल्या एअर फोर्स शाळेच्या मैदानावर मुले खेळत होती. यावेळी मैदानावर काहीतरी वेगळी वस्तू असल्याचे विद्यार्थ्यानी शिक्षकांना सांगितले. त्यानंतर ताबडतोब शिक्षकांनी याबाबत पोलिसांना सांगितले.

  • याची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि बीडीडीएस दाखल झाल्यानंतर संबंधित संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे. त्याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
HB_POST_END_FTR-A2