Pune : आरटीआय कार्यकर्ता विनायक शिरसाट हत्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट याच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना तेलंगाणा राज्यातून अटक केली आहे.

मुक्तार अली आणि फारुख खान अशी आरोपींची नावे आहेत. तर आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेच्या दिवशी आरोपीच्या लोकेशन वरून शिरसाट याचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.

  • ३० जानेवारी रोजी विनायक यांचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. अखेर सोमवारी दुपारी लवासा रोडवरील मुठा गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळला होता.

विनायक शिरसाट हे रिपब्लिकन कामगार सेनेचे शहर अध्यक्ष होते. तसेच ते माहिती अधिकार कार्यकर्तेही होते. त्यांनी शिवणे, उत्तमनगर, नऱ्हे, आंबेगाव, जांभूळवाडी येथील अनेक अनधिकृत बांधकामांबाबत पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएकडे तक्रारी अर्ज केले होते. त्यांच्या अर्जावरून काही ठिकाणी कारवाईसुद्धा करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.