Pune : मेट्रोच्या कामासाठी अडचणीचे ठरणारे दोन्ही उड्डाणपूल महिन्या अखेरीस पाडणार ; PMRDAचे संकेत

Both flyovers, which have been a problem for Metro work, will be demolished by the end of the month; Indications of PMRDA

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर ते हिंजवडी एलोव्हेटेड मेट्रोच्या कामासाठी अडचणीचे ठरणारे विद्यापीठ चौकातील दोन्ही उड्डाणपूल या महिन्याअखेरीस पडण्यात येणार आहे, तसे संकेत PMRDA तर्फे देण्यात आले आहेत.

साधारण हे उड्डाणपूल पाडण्यासाठी 25 दिवस लागणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्याने रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी आहे. या कालावधीत हे दोन्ही उड्डाणपूल पाडण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीने उड्डाणपूल पाडायला मंजुरी दिली आहे. या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधताना महापालिका कोणताही खर्च देणार नाही.

नवीन टेंडर मंजूर होईपर्यंत पूल पडू नये आणि वाहतुकीचे नियोजन करावे, अशा उपसुचनेसह पूल पाडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

तसेच पूल पाडण्यासाठी राज्य शासनानेही मान्यता दिली असून , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तर्फे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे.

विद्यापीठ चौकातील दोन्ही उड्डाणपूल चुकीचे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर रोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हे उड्डाणपूल पाडून नव्याने उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत.

उड्डाण पूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा करण्यात आला आहे. पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे. हे उड्डाणपूल पाडून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २४० कोटी रुपये खर्च होणार आहे.

सध्या कोरोनाचे संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे हे दोन्ही उड्डाणपूल तातडीने पाडून मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.