Pune : ब्राह्मणांची नवीन संघटना उभारणार – आनंद दवे

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निर्णय

एमपीसी न्यूज – दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधत आपण ब्राह्मणांची नवीन संघटना उभारणार असल्याची माहिती आनंद दवे यांनी आज दिली.

कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिल्याने दवे यांची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातून हकालपट्टी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर आनंद दवे म्हणाले, तीन वर्षांत ब्राह्मण महासंघात शेकडो कार्यकर्ते जोडले गेले. सध्याचे ब्राह्मण समाजाचे नेतृत्व विकले गेले आहे. सध्या समाजबांधवांची नाराजी आहे. नवीन संघटना बांधून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे काम करणार आहे. प्रत्येक जाती-धर्माचे काम करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like