Pune : मंदिरे उघडण्याठी ब्राह्मण महासंघाचा शंखनाद

Brahmin Federation's Shankhanad for opening temples

एमपीसी न्यूज – राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्य शासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी   ब्राह्मण महासंघातर्फे मंगळवारी पुण्यात शंखनाद आंदोलन करण्यात आले. ग्रामदैवत व मानाचा पहिला कसबा गणपती मंदिराबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यातील अनेक भागात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करीत आहे.

लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू होती. आता लॉकडाउन शिथिल केल्याने सर्व प्रकाराची दुकाने सुरू करण्यात आली आहेत.

पण, मंदिरं, नाट्यगृह, शॉपिंग मॉल अद्यापही बंद आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली.

सकाळी किंवा संध्याकाळी किमान दोन तास तरी मंदिरे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.

मंदिरे सुरू झाल्यास त्यांच्याशी निगडित असलेल्या नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.