Pune: पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास

Pune: Break the donation box in Pasodya Vithoba temple and stole the money बंद घरांनंतर आता चोरट्यांची मंदिरांवर नजर

एमपीसी न्यूज – पुण्याच्या बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला मारला आहे. शनिवारी मध्यरात्री मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी अर्पण केलेली रक्कम या चोरट्यांनी लंपास केली. 

दैनंदिन पूजाविधी करण्यासाठी आज पहाटे गुरुजी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. चोरटे दरवाजा तोडून पहिल्या मजल्यावर गेले आणि त्यानंतर दानपेट्या फोडल्या. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुण्यातील बुधवारपेठेत हे शिवकालीन मंदिर आहे. पूर्वी या परिसरात पासोड्या विकणारे लोक या विठ्ठल मंदिराजवळ बसत होते. या परिसरात त्यांची दुकाने होते. त्यामुळे या मंदिराला पासोड्या विठोबा मंदिर असे नाव पडले. या मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीजवळच दानपेटी ठेवलेली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरत्याने ही दानपेटी फोडली आणि त्यातील रोख रक्कम पळवली.

पुण्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे बंद घरांवर पाळत ठेवून दिवसाढवळ्या घरफोड्या होताना दिसत आहेत. आता तर मंदिरातील दानपेट्या फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.