Pune Breaking News : कोंढवा परिसरातून पीएफआयचे 6 जण चौकशीसाठी ताब्यात

एमपीसी न्यूज – कोंढवा परिसरातून पीएफआयच्या (Popular Front Of India- PFI) सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्या आणि एनआयएने केलेल्या कारवाईला धरून पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पीएफआयच्या चार जणांवर आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या दोन जणांवर हि कारवाई केली आहे. यामध्ये माजी SDPI अध्यक्ष अब्दुल बंसल, दिलावर सैय्यद (SDPI) आणि पीएफआयच्या अयनुल मोमीन, काशीफ शेख, माज शेख, मोहम्मद कैस अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

PCMC News : शहरातील भटकी कुत्री, मांजर यांच्यासाठी बुधवारी लसीकरण शिबिर

एनआयएने दोन दिवसांपूर्वी देशभरात कारवाई केली होतीय. यामध्ये पुण्यातील रझी अहमद खान आणि कयूम शेख या दोन पीएफआयच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआय संघटनेने पोलिसांनी परवानगी नसतानाही आंदोलन केले होते. या आंदोलनातया संघटनेने पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजीही केली होती. यामुळे देशभरात वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा घोषणा आणि कृत्यांना सहन केले जाणार नाही अशी घोषणा केली होती. आता याच पार्श्वभूमीवर पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.