Pune Breaking News : मुख्यमंत्र्याच्या जवळचा असल्याचे सांगत अमित शहांच्या ताफ्यात शिरली एक व्यक्ती

एमपीसी न्यूज -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे (Pune Breaking News) यांच्याजवळचा असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री अमित शहांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.गंभीर म्हणजे या व्यक्ती याला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले.

सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे. विविध कार्यक्रमानिमित शहा हे पुण्यात आहेत.

Pimpri News : भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

तेव्हा सोमेश धुमाळ याने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगून एका अधिकाऱ्याच्या वाहनांत गेला.स्थानिक पोलिसांना चकवा देणारा सोमेश धुमाळ मात्र शहांसोबत असलेल्या पोलिस यंत्रणेच्या नजरेतून सुटला नाही.

त्याचा माग काढत अखेर जेडब्ल्यू मॅरेट मधून स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे सांगत होता.  सोमेश ला पिंपरी चिंचवड (Pune Breaking News) पोलिसांच्या ताब्यात देँण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.