Pune Breaking News : एकाच कुटुंबातील 7 जणांचे सापडले मृतदेह; आत्महत्या की घातपात?

एमपीसी न्यूज – दौंड तालुक्यातील पारगाव (Pune Breaking News) येथे भीमा नदीकाठी पोलिसांना एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह पोलिसांना 18 ते 22 जानेवारी या कालावधीत आढळले असून त्यांची आज (मंगळवारी) ओळख पटली आहे. ते सातही मृतदेह पती-पत्नी, मुलगी-जावई आणि तीन मुले असे एकाच कुटुंबातील असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोहन उत्तम पवार, संगीता पवार त्यांची मुलगी राणी श्याम फुलवरे व तिचा पती श्याम फुलवरे अशी मयत व्यक्तींची आहेत.

Pune Crime : पुण्यात 12 तासात दोन गोळीबाराच्या घटना

हे कुटुंब 17 जानेवारी रोजी घरातून निघाले. चौफुला पारगाव येथे आल्यानंतर (Pune Breaking News) त्यांनी भीमा नदीत उडी घेत आत्महत्या केली. कौटुंबीक प्रकरणात बदनामीच्या भीतीने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरीही आत्महत्या आहे की घातपात याचा पोलीस तपास घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.