Pune : मद्यपान करुन येणाऱ्या कर्मचा-यांवर ब्रेथ ॲनलायझरची राहणार नजर 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या व्हेईकल डेपो , घनकचरा ,पाणी पुरवठा या विभागातील वाहनचालकांसाठी  ब्रेथ ॲनलायझर हे मशीन बसविण्यात येणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक सेवा पुरवणारे कर्मचारी मद्यपान करुन काम करीत आहेत का ? अशा शंकेचे समाधान करता येणार आहे . अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. त्यामुळे आता मद्यपान करणाऱ्या कर्मचारी वर्गावर ब्रेथ ॲनलायझर यंत्राची नजर असणार हे स्पष्ट झाले आहे.

नववर्षच्या स्वागताची तयारी सर्वत्र होत असताना पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ब्रेथ ॲनलायझर हे यंत्र वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांना देण्यात आले. या यंत्राच्या माध्यमातून चालकाने मद्यपान केले आहे ? का नाही हे समजण्यास मदत होणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून 100 यंत्र दिली जाणार असून पहिल्या टप्प्यात 25 देण्यात आली आहेत.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की , पुणे महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांना प्रत्येक वेळी अनेक वस्तु रुपात मदत करण्यात आली असून आता ब्रेथ ॲनलायझर हे यंत्र त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे मद्यपान करुन जे वाहन चलवितात त्यांचावर कारवाई करण्यास त्याना मदत होईल. मात्र कोणीही मद्यपान करू नका अणि मद्यपान करुन वाहन चालवू नका असे आवाहन देखील त्यानी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.