Pune : महानगरपालिकेचा आरोग्य निरीक्षक एसीबीच्या जाळयात; कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

एमपीसी न्यूज – कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारकडे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एका आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश मोहन तेलकर (वय ५३, आरोग्य निरीक्षक, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका) असे अटक केलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत संबंधित तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

  • याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांचे सर्व्हे नंबर ३४/३/४, आंबेगाव पठार येथे दोन दुकानगाळे भाड्याने घेतले आहेत. या दुकानगाळ्यांसाठी ड्रेनेज लाईन नाही तसेच कमर्शिअल लाईट मीटर नाही. त्यामुळे या कारणावरून तक्रारदार यांच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर याने सुमारे पाच हजाराची लाच मागितली.

यावेळी तक्रारदार याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार या विभागाने २८ जानेवारी २०१९ रोजी पडताळणी केली असता आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर याने कारवाई टाळण्यासाठी सुमारे पाच हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

  • त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर याच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिला आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.