Pune: कोरोना रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणा- कुणाल कुमार

Pune: Bring mortality rate of corona patients to zero- Kunal Kumar रुग्णांना मानसिक उपचार देण्याबरोबरच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे.

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे सखोल परीक्षण करून पुण्यातील मृत्यूदर हा शून्यावर आणा, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी दिली.

कोरोनामुळे करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्रीय पथक पाहणी व आढावा घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहे. सर्व रुग्णालयांमध्ये क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही या पथकाने दिल्या आहेत.

या पथकाचे प्रमुख कुणाल कुमार, सदस्य अरविंद कुशवाह व डॉ. सिमिकांता बॅनर्जी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन यांच्यावरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णांना मानसिक उपचार देण्याबरोबरच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे.

सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य कल्याण योजनेचा लाभ रुग्णांना देण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर म्हणाले.

यापुढे 45 दिवस महत्त्वाचे आहेत. प्रत्येक व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे सौरभ राव यांनी सांगितले. तर, पुणे जिल्ह्यात 14 ते 24 जुलै या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच खाटा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. तब्बल नऊ हजार 332 खाटा उपलब्ध झाल्या आहेत. खाटांची संख्या 24 हजार 194 पर्यंत गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.