Pune : पुण्यात सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून

Brutal murder by stabbing a criminal in Pune

एमपीसी न्यूज  – पुण्यातील कोंढवा परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निघत पद्धतीने खून करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घनशाम उर्फ पप्पू पडवळ असे खून झालेल्या सराईतचे नाव आहे कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार मयत पप्पू पडवळ हा सराईत गुन्हेगार आहे. सध्या तो व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होता. यापूर्वीही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.

दरम्यान आज सकाळी तो घरात असताना अज्ञात हल्लेखोरांनी घरात शिरून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून खून केला. याची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.