Pune : दूध व्यावसायिकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

एमपीसी न्यूज – बेकायदा बांधकामांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणा-या शिवसेना उपविभाग प्रमुखावर कोयत्याने वार करुन खून केल्या घटना आज (दि.1) पुण्यामध्ये कस्तुरबा वसाहतीमध्ये घडली.

रोहित जुनवणे ( वय 28. रा. कस्तुरबा वसाहत औंध) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, आकाश जुनवणे याने फिर्याद दिली असून, चतुश्रुंगी पोलिसांनी गजेंद्र मोरे (वय-28) याच्यासह चौघांना ताब्यात घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीत जुनवणे दुध वाटपाचे काम करत होता. नेहमीप्रमाणे दुध वाटप करण्यासाठी जात असताना कस्तुरबा वसाहत परिसरात दबा धरून बसलेल्या 10 ते 12 जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये डोक्याला गंभीर जखम झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

गजेंद्र मोरे हा सराईत गुंड असून त्याच्यावर यापुर्वी खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. मयत आणि आरोपी हे एकाच परिसरात वास्तव्यास होते. रोहीत जुनवणे याने गजेंद्र मोरे याच्या बेकायदेशीर बांधकामाची माहिती आरटीआय कायद्याअंतर्गत मागवली होती. यावरूनच त्यांच्यात यापूर्वीही वाद झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.