Pune : कोथरूड येथे होणार कला अकादमी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. साहित्य, कला, संस्कृती, नृत्य, संगीत, अभिनय, चित्रपट, नाटक, लोककला आदी क्षेत्रातील मान्यवर संस्थांचे माहेरघर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर कलाकार पुण्यात वास्तव्याला आहेत. सर्व कला प्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी कलाकारांची बर्‍याच वर्षांपासून मागणी आहे. त्यामुळे ‘गोवा अकादमी’च्या धर्तीवर कोथरुड येथे कला अकादमी स्थापन करण्यात येणार आहे.

विविध कलांच्या प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनासाठी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 च्या अंदाजपत्रकात दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तशी घोषणा केली होती. त्यानुसार रासने यांनी ही अकादमी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पण, ही अकादमी कोथरूडमध्ये नेमकी कुठे होणार याची माहिती त्यांनी दिली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.