Pune : घरफोड्या करणारे बंटी- बबली जेरबंद; अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

Burglar Bunty- Bubbly arrested ; Two and a half lakh items confiscated : साफसफाई करण्यासाठी लागणारे साहित्य विक्री करण्याच्या बहाण्याने ते दिवसा रेकी करत आणि रात्रीच्या वेळी चोरी करत

एमपीसीन्यूज ; पुणे शहर आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत पती-पत्नीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी आणि इतर असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रामा पापा जाधव उर्फ रामा सोनाजी कांबळे (वय 29) आणि उषा रामा कांबळे (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. हे दोघेही बंटी बबली या नावाने कुप्रसिद्ध आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही सराईत आरोपी पुण्यातील कॅम्प परिसरात आले असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही अटक केली.

त्यांच्याकडे केलेला चौकशीत त्यांनी पुणे शहर आणि कामशेत परिसरात घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले.

साफसफाई करण्यासाठी लागणारे साहित्य विक्री करण्याच्या बहाण्याने ते दिवसा रेकी करत आणि रात्रीच्या वेळी चोरी करत असत.

आरोपी हे सराईत आणि अट्टल गुन्हेगार आहेत. बंटी आणि बबली या नावाने घरफोड्या करणारी कुप्रसिद्ध जोडी म्हणूनही ते ओळखले जातात. यापूर्वीही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस ठाण्यात घरफोडी केल्याप्रकरणी त्यांच्यावर 26 गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like