Pune : ज्वेलर्सचे दुकान फोडून साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – सराफी दुकान फोडून चोरटयांनी साडेअकरा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि.27) सकाळी साडेअकराच्या दरम्यान नळस्टॅाप चौकाजवळील संगमनेरकर ज्वेलर्स या दुकानात उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेरकर ज्वेलर्स हे दूकान रविवारी (दि.25) रात्री 9 पासून मंगळवार (दि.27) सकाळपर्यंत कुलूप लावून बंद होते. दरम्यान चोरटयांनी दुकानाच्या शटरच्या वरील बाजूने आत प्रवेश केला आणि खिडकीची काच व जाळी तोडली. तसेच दुकानाच्या पीओपीचे छत फोडून दुकानात प्रवेश करून आतमधील सोन्या-चांदीचे तब्बल 11 लाख 70 हजारांचे दागिने लंपास केले.

याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like