Pune : सराफी दुकान फोडून चोरट्यांनी केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – सराफी दुकान फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.ही घटना गुरूवारी (दि.22) रात्री 10 नंतर वडगावशेरी येथील खराडकरनगर येथे घडली.

याप्रकरणी चेतन ओसवाल (वय 37, घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन यांचे वडगावशेरी येथे पार्श्व गोल्ड नावाचे सोन्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री दुकान कुलूप लावून बंद केले. मध्यरात्री चोरटयांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. व दुकानातील तब्बल 4 लाख 20 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.