BNR-HDR-TOP-Mobile

Pune : परिहार चौकातील नाकोडा ज्वेलर्समध्ये चोरी ; 15 ते 20 लाखाचा मुद्देमाल लंपास (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- औंध परिसरातील परिहार चौकात असलेल्या नाकोडा ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून दुकानातील तब्बल अंदाजे 30 ते 35 किलो चांदी आणि 1 किलो सोने चोरटयांनी लंपास केले. हे घटना आज, गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान घडली.

घटनास्थळी पोलीस, श्वानपथक दाखल झाले असून पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे. नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे आताच सांगता येणार नसल्याचे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले. नाकोडा ज्वेलर्सचे मालक मनीष सोनिगरा यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे 15 ते 20 लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement