BNR-HDR-TOP-Mobile

Pune  : कोथरुड मध्ये एका रात्रीत 2 ठिकाणी घरफोड्या; तब्बल 9 लाखांचा ऐवज लंपास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कोथरूड परिसरात एकाच रात्रीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. कोथरुड येथील कुंबरे पार्क एकलव्य पार्कजवळ आणि गणेश कॉलनी गांधी भवन रोड येथील फ्लॅटमध्ये बुधवारी (दि.16) सायंकाळी 7 ते गुरुवारी (दि.17) सकाळी 10 यादरम्यानया घटना घडल्या.

याप्रकरणी मारुती भरेकर (वय 49, रा.कोथरुड) आणि मंगेश बोरसे (वय 38,रा.बावधन खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यानी दोन्ही फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाला आणि मुख्य दाराला लावलेले कुलूप हत्यारांनी उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम असा दोन्ही घरांमधील मिळून एकूण 9 लाख 19 हजार 844 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

कोथरूड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.