BNR-HDR-TOP-Mobile

Pune: धायरीत जबरी चोरी, लाखोचा ऐवज लंपास

एमपीसी न्युज – पुण्यातील धायरी परिसरातील डी.एस. के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या घरावर सोमवारी मध्यरात्री 5 ते 6 जणांनी जबरी चोरी करत तब्बल 10 तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपयाचा ऐवज लुटून नेला.

प्राथमिक माहितीनुसार, धायरीतील डी. एस. के शाळेच्या पाठिमागे असलेल्या शेतात बाळू पोकळे यांचे घर आहे. या घरात बाळू पोकळे हे कुटुंबियासोबत झोपले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास 5 ते 6 जण आले. त्यांच्या आवाजाने बाळू पोकळे उठले. त्यांनी दार उघडताच ते घरात शिरले. सर्वांना धमकावत त्यांचे हातपाय बांधले आणि घरातील 10 तोळे सोन्याचे दागिने, कपाटात ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड असा ऐवज जबरदस्तीने चोरला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी गेले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like