Pune : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने चोरीस

एमपीसी न्यूज – बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील 4 लाख 24 हजार 640 रूपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी (दि.2) रात्री साडेनऊ नंतर विश्रांतवाडी येथील आदर्श कॉलनीमध्ये घडली.

याप्रकरणी संदीप बारापात्रे (वय 41, रा.विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बारापात्रे यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. फ्लॅटमध्ये प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील 4 लाख 24 हजार 640 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.