Pune : संविधान जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यात मनुस्मृतीचे दहन

एमपीसी न्यूज- दिल्ली येथे संविधान जाळल्याच्या घटनेचे पडसाद देशभरात पहायला मिळत आहेत, आज या घटनेच्या निषेध करत पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनुस्मृतीचे दहन केले.

दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी भारतीय संविधान जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात निषेध केला जात आहे. आज सकाळी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन करत, तसेच संविधान जाळणाऱ्या व्यक्तींचा निषेध म्हणून मनुस्मृतीचे दहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.