Pune : वाढदिवसाला फटाके फोडणे पडले महागात, गच्चीवरील साहित्याला आग

एमपीसी न्यूज – फटाक्यांनी वाढदिवस साजरा करणे काही (Pune) तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या मुलांनी मित्राचा वाढदिवस रस्त्यावर साजरा केला, यावेळी त्यांनी फटाक्याचे शॉट उडवले. या शॉटची ठिणगी गच्चीवरील साहित्यात पडली व बघता-बघता सामानाने पेट घेतला. हा प्रकार पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये बुधवारी (दि.31 मे) मध्यरात्री घडला.

आग गच्चीवर लागल्याने ती लांबून दिसत होती. यामुळे नागरिकांनी त्वरीत अग्निशमदलाला वर्दि दिली. यावेळी कात्रज व सिंहगड येथील अग्निशमनदलाच्या दोन गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या.

या आगीत गच्चीवर असलेले कागद, लाकडी सामान जळून खाक झाले. गच्चीच्या खालच्या मजल्यावर कॅन्टीन असल्याने कॅन्टीनचेही साहित्य जळाले. ही आग दहा ते 15 मिनीटात पुर्णपणे विझवण्यात आली. हि कामगीरी सिंहगड रोड अग्निशमनदलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र असे (Pune) रस्त्यावर वाढदिवस साजरे करणे, फटाके फोडणे किती धोकादायक आहे याचा सर्वांनी विचार करायला हवा. सध्या कडक ऊन व उष्णता यामुळे कोरड्या व वाळलेल्या वस्तू या एका ठिणगीनेही आग पकडू शकतात त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.