Pune News : पुण्यातील कात्रज मध्ये एका व्यावसायिकाची फसवणूक

 एमपीसी न्यूज : कांदा परदेशात विकून नफा करून देतो असे अमिष दाखवत पुण्यातील व्यावसायिकाला 46 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. (Pune News) स्वप्नील बेल्हेकर यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सिद्धाप्पा भंडारी, गजेंद्र सिद्धाप्पा, हे दोघे ही कर्नाटक चे राहणारे असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi News : हिंजवडी आयटीपार्क मधील समस्यांसाठी पोलीस, ग्रमपंचायत व औद्योगिक संघटना यांची बैठक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 2021 पासून आत्तापर्यंत सुरू होता. बेल्हेकर आणि सिद्धाप्पा भंडारी तसेच गजेंद्र यांच्या मध्ये व्याव्यास्या निमित्त ओळख झाली होती. (Pune News) आम्ही कांद्याचे मोठे व्यापारी आहोत आणि तुमचा माल परदेशात विकून मोठा नफा करून देतो असे सांगत त्या दोघांनी बेल्हेकर यांचा विश्वास संपादन केला. व्यवसायाच्या नावाखाली त्यांनी अनेक वेळा बेल्हेकर यांच्याकडून कांद्याचा माल घेतला पण त्याचे पैसे कधीच दिले नाहीत. दोघांनी मिळून बेल्हेकर यांना 46 लाख रुपयांना गंडा घातला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.