Pune Suicide: पुण्यातील हडपसर परिसरात व्यावसायिक तरुणाची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज: कौटुंबिक वादातून एका 26 वर्ष तरुणाने स्वतःच्या डोक्यात गावठी पिस्तूल मधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. (Pune Suicide) हडपसर परिसरातील भागीरथी नगर मध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विशाल राजेंद्र तोडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आठ महिन्यापूर्वीच या तरुणाचे लग्न झाले होते. हडपसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल तोडकर यांनी प्रेम प्रकरणातून आणि कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये विशाल तोडकर यांचे लग्न झाले होते. मात्र बाहेर त्यांचे प्रेम प्रकरण असल्यामुळे घरात वाद होत होते. याच कारणामुळे तीन महिन्यापूर्वी त्यांची पत्नी घर सोडून गेली होती. या कारणामुळे तो सतत नैराश्यात असायचा. याच कारणातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maval News : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी मावळ भाजपची जोरदार तयारी

विशाल तोडकर हे व्यावसायिक होते. त्यांचा कपड्याचा व्यवसाय होता. हडपसर परिसरात ते पत्नी आणि आईसह राहत होते. रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी गावठी पिस्तूल मधून स्वतःच्या डोक्यात झाडून मारून आत्महत्या केली. (Pune Suicide) दरम्यान आज सकाळी ते फोन उचलत नसल्याने कुटुंबीयांनी येऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी नोंद केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.