BNR-HDR-TOP-Mobile

Pune : टीका करून 15 वर्षांपासून रखडलेले प्रश्न सुटणार आहेत का?, डॉ अमोल कोल्हेंचा आढळरावांना सवाल

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – निवडणुकीच्या मैदानात माझ्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. परंतु मी ही छत्रपतींचा मावळा आहे. त्यामुळे कुठल्याही टिकेला घाबरत नाही. परंतु माझ्यावर टीका करून शिरूर मतदारसंघातील 15 वर्षांपासून रखडलेले प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल डॉ अमोल कोल्हे यांनी आढळरावांना विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाकण येथील सभेत कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी 2014 प्रमाणे पंतप्रधान निवडून देण्यासाठी नव्हे तर, खासदार निवडून देण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले. तसेच त्यांनी शेतकऱ्याच्या मुलगा आणि तरुणाईचा प्रतिनिधी म्हणून दिलेल्या उमेदवारीसाठी पक्षाचे आभार मानले.

.

HB_POST_END_FTR-A1
.